DesiEvite Blog

Recently Posts

Categories

वसंत पंचमी

Monday, January 30, 2017 | 7:06:00 AM


वसंत पंचमीशिशिर ऋतूत येणार्‍या माघ शुद्ध पंचमीला वसंतपंचमी म्हणतात. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.

 

माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूनां कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे.

 

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. स्वत:च्या आगळया सौंदर्याने तो माणसाला स्वत:कडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे. मानवाने स्वत:च्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक असा अजब जादूगार आहे की, जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो. निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.

 

वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वत:च्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

 

वसंत म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवर्णा साधनांचे फारच महत्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत नाही.

 

जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संत! यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव जीवन आणि कवन, भक्ती व शक्ति, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य्, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.

Posted By

User Comments

Leave a comment/Review?

  • Your IP is being logged.
  • Your e-mail address is used only for verification purposes only and will not be sold, or shown publicly.
  • HTML tags allowed.