Sudhir Dharmadhikari

Articles/Poems/Quotes

 
Posted on: 3/7/2017 10:53:00 PM

मानलेली Girlfriend . .

 

मानलेल्या नात्यांमध्ये एक चांगलं असतं. एका side ने मानलं कि दुसऱ्याला नाही म्हणताच येत नाही. “नाही” म्हणलं तर सभ्यपणा समजत नाहीत. तशी माधुरी माझी मानलेली Girlfriend. कित्येक वर्षं झाली या नात्याला नावच सुचत नव्हतं. परवा अचानक कोणाशीतरी बोलताना बोलून गेलो आणि मित्रं हसून म्हणाला चांगलं title होईल तुझ्या पुढच्या लेखाचं ! मानलेलं नातं असल्यानं पलीकडच्या बाजूने होकाराचा प्रश्नच नाही !


Oh by the way, ही दीक्षितांची माधुरी हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर i doubt you are qualified to read this article ! आणि आता हे दीक्षित कोण असं म्हणून आसपासचे दुसरे कोणीतरी आठवायचा प्रयत्न करत असाल तर मात्र तुम्ही आत्ताच जन्माला आला आहात असं मी समजतो. हो आणि अजून एक, दुसऱ्या स्त्री चं, मग ती कोणी का असेना, कौतुक सहन न होणाऱ्या, कमकुवत हृदयाच्या स्त्रियांनी पण हा article वाचण्याचं धाडस करू नये. आणि ती एक माणूस म्हणून कशी होती हे लिहिण्याइतका उच्च विचारांचा प्रगल्भ मी नाही. स्वतःची टपोरी version जपून ठेवायचा मला पण अधिकार आहे. “तिच्या पेक्षा मला ती actress आवडते”, असा comment पण या कमकुवत स्त्रियांनी करू नये, मी तो “दुसऱ्यावर जळणं” या category मध्ये टाकतो.


college मधे असताना आमचा एक शाळेमधे जाणारा आमच्या पेक्षा लहान आणि बावळट मित्र होता. पण तो आमच्या पेक्षा smart आणि दूरदर्शी निघाला. अचानक एके दिवशी येउन म्हणाला “श्रीदेवी संपली”. मी म्हणलं ती काय डाळ तांदुळाची खिचडी आहे का संपायला ? पण नुकताच तेजाब बघून आला होता. नंतर आम्ही तेजाब वैगेरे माधुरीचे सिनेमे बघत गेलो आणि वाटलं खरच श्रीदेवी खिचडीच होती,सगळं थोडं थोडं घातलेली. काहीच नाही घरात म्हणून पटकन पोट भरेल अशी. माधुरी ही wine पासून सुरुवात आणि Tiramisu च्या सुंदर dessert चा शेवट, अशी full course dinner होती. मधेच कधी chicken हंडी सारखी hot वाटायची तर कधी दाल rice सारखी simple. कधी “बहोत प्यार करते है” सारखं simple ड्रेस आणि simple expressions देत मोहरून टाकायची तर मधेच कधी “चोली के पीछे क्या है” असं द्विअर्थी म्हणत वाईट संस्कार करायची. कधी “खेल” सारखी भूमिका करून हसवत ठेवायची.


सिनेमांमध्ये कधीतरी super star वाटायची तरी कधी college मधली नेहेमीचीच, काही कारण नसताना खिदी खिदी हसणारी टिपिकल. ती सुंदर dance करते आणि acting सुद्धा हे सांगण्यात फार वेळ घालवणार नाही. तिच्याबद्दल ही “कोणीतरी जवळची” असं एक feeling यायचं. म्हणजे ती star असली तरी, एकदम रस्त्यात भेटेल सुद्धा, भेटली तर “हो नं, अजिबात अभ्यास झालेला नाही माझा” असं काहीतरी म्हणेल सुद्धा ! माधुरी चक्क मुलींना पण तेव्हढीच आवडायची ! (मला आवडत असून सुद्धा ) माझ्या बायकोला पण आवडते !! मी इथं खर म्हणजे लिहिणं थांबवू शकतो. पण लिहितोच . .


माझ्या आणि बायकोच्या आवडी निवडी जमायला सगळं तरुणपण गेलं. आणि आता आम्ही काही common गोष्टींवर settle झालो आहोत, त्यात माधुरी हि एक ! तिचं “मेरे प्यार का रस जरा चखना” या गाण्यावर साधा पण अगदी नखरेल डान्स बघायची हुक्की आम्हाला अजूनही येते. इतका सिम्पल डान्स इतका छान का वाटतो याचं अजूनही आश्चर्य वाटतं. तसंच “अखियां मिलाऊ” गाणं. तिरळे डोळे करून सुद्धा सुंदर दिसणाऱ्यांपैकी हि एक ! आणि डान्स करताना शेजारच्या हिरोकडे मुलींचं सुद्धा लक्ष जाऊ नये अशी.


आपल्याला लहानपणी अशक्य गोष्टीवर निबंध लिहायला सांगायचे. “मी पंतप्रधान झालो तर” वैगेरे ! ही सवय college कट्ट्यांवर पण चालू राहते. कोणत्यातरी निरोद्योगी टाळक्याने एकदा “एक दिवस माधुरी दिली तर?” असा निबंधाचा विषय दिला होता. एकतर राहिलेल्या group ला “दिली” या शब्दाचा राग आला. तू कोण देणारा, काय तुझीच “मानलेली” आहे का ? हा पहिल्यांदा वाद. कोणालातरी या बाबतीत “देणं” हा शब्दं degrading वाटला. त्यामुळे मित्रांचे “मस्तं गप्पा मारीन” पासून “सांगू नये” असे अलंकारिक निबंध होते. तिथे पण फुल course dinner ची variety!


“नजरे मिली दिल धडका love you राजा” ह्या गाण्यातलं “फक्तं” पांढऱ्या top वरच्या  गाण्यामधे तिचं नाचणं मोहक होतच पण आम्हाला पहिल्यांदा तो top म्हणजे त्याचा झब्बा वाटला ! अश्या ओल्या रात्री ह्याचा झब्बा तिच्या अंगावर कसा याच्यावर आम्ही पडका चेहरा करून discussion पण केलं.  हेच सगळे आम्ही मग, तिचं लग्न ठरलं तेंव्हा निषेधाचे काळे झब्बे  विकत घ्यायला गेलो. हेच काय, तिच्या लग्नाच्या अक्षतांमध्ये काळे तांदूळ मिसळणारे पण आम्हीच ! तिच्या घरच्यांच्या तिच्या नवऱ्या बद्दलच्या अपेक्षा ऐकून मात्र आम्ही पेटलो ! कुठेतरी वाचलं. “कोण माधुरी दीक्षित ?” असं विचारण्या इतपत तो मुलगा indian सिनेमा आणि तिच्याशी अनभिज्ञ असला पाहिजे ! एवढीच फक्तं अपेक्षा होती म्हणतात ! काय हे ! आम्हाला विचारता आला नसता का हा प्रश्न ?? आम्हाला ती माहिती नाही असं ओरडत मोर्चाही नेला असता कदाचित ! :)


माधुरी बरोबर कोणी अगदी नवखा आणि नुकताच acting school मधून बाहेर पडलेला हीरो असला की खूप राग यायचा. म्हणजे आम्ही college मधून कष्टानी degree मिळवणार, कुठेतरी trainee म्हणून लागणार , आणि office मधली अडगळीची कामं आमच्या माथी, आणि इकडे मात्र या बच्च्यांना माधुरी ! संजय कपूर, सैफ अली, अक्षय कुमार हे असलेच सगळे. पास व्हायच्या आधीच मोठी नोकरी लागलेले आणि पाहिजे ते डिपार्टमेंट मिळालेले ! अनिल कपूर बरोबर ती जरा जास्तच धक धक बिनधास्त असते म्हणून आमचा त्याच्यावर special राग. जाऊ दे.


मराठीमधे काही शब्दांमधेच त्याचा अर्थ लपलेला असतो. बघा नं, “सुंदर” हा शब्दच दिसायला किती सुंदर आहे. अर्थ सांगायची गरजच नाही. त्याची वळणाकृती मूर्ती बघा. तो “स” च्या उकाराचा साडी किंवा घागऱ्या सारखा घोळ बघा. ती कपाळावरची छोटीशी टिकली बघा. पण तरीही “सुंदर” हे बरचसं बाह्य सौंदर्या पर्यंत सीमित. पण “मोहक” शब्द ? आणि of course तसाच “मधुर” शब्दं. मधुर शब्दाचं माधुर्य वेगळंच. त्याला “सुंदर” च्या मर्यादा नाहीत ! सौदर्य वयस्कर होऊ शकतं, माधुर्य नाही ! तशीच ही माधुरी.


मी आत्ताच गम्मत म्हणून “define madhuri” असं google केलं आणि आलेली definition वाचून हसू आलं ! Meaning is “The most attractive girl in school. Dark, beautiful, funny, and smart. The best friend you will ever have and the most entertaining person you will ever meet”  येव्हढं  लिहिण्या पेक्षा ही link पुरेशी होती का ? http://www.urbandictionary.com/define.php?term=Madhuri


तर कधीतरी खरी नाती कदाचित तुटू शकतात, पण मानलेली नाही :)  So no breakup here ! :)

 

तेरी खातीर फरिश्ते …

सर पे इल्जाम लेंगे , हुस्न कि बात चली तो,  सब तेरा नाम लेंगे , चांद आहे भरेगा  … हे गाणं माझ्या एकदा डोक्यात गुणगुण करणं  सुरु झालं कि थांबतं फक्तं कोणीतरी हे म्हणाल्या वर "क्या सुधीर, गाना बदलो न अभी ! " या गाण्याची tune मला फार आवडते पण माझी record अडकते ती या ओळींवर "तेरी खातीर फरिश्ते सर पे इल्जाम लेंगे" ! कारण मला लहानपणा पासून कोणत्याही कवीने स्त्री वर्णना मध्ये "पातळी" सोडली कि त्या फारीश्त्यांकडेच जाऊन complaint करावीशी वाटते !

पण मला काय माहिती हेच फरिश्ते आता जगाचं कल्याण सोडून, college कट्ट्या वर बसून, table-fan सारख्या माना फिरवत, प्रत्येक मुली कडे बघण्यात दंग असतात आणि तिचा रुमाल पडला कि तो इल्जाम आपल्या सर पर  घेऊन तिला तो प्रेमाने आणून देतात ? आणि परत फारीश्त्यांचा कळपामध्ये येउन म्हणतात " जवळून तर लय भारी हुस्न आहे एड्या !" come on poets, you  should have some लगाम on your "poetrism" when it comes to praising woman's beauty ! :) का कुणास ठाऊक , मला असं वाटतं , सर पे इल्जाम लेंगे हे वाक्य फक्तं mother teresa ना म्हणणं योग्यं वाटतं ! :) :)  बाकी सगळे शब्द काढून टाका आणि विचार करा ! चांद आहे ठीक आहे, फुल दिल ठाम हे पण ठीक आहे पण, आता तिथेच थांबा !  फारीश्त्यांना त्यांच्या profile प्रमाणे job करू द्या !

"जीवन से भरी तेरी आंखे" हे गाणं मी नेहमी गातो . नेहमी गातो याचा अर्थ असा नाही कि सुरात गातो  !   त्यातल्या या ओळी "मजबूर करे जिने के लिये " काहीच हरकत नाही  , "सागर भी तरसते है तेरे रूप का रस पिने के लिये" पण चालवून घेईन पण "मधुबन कि सुगंध ही सासो मे ?? आम्ही जरा त्या सागरा मध्ये डुंबायला लागलो तर सोडली तुम्ही वास्तवता लगेच :) हि कोणत्या nose spray ची  जाहिरात आहे का ?  म्हणजे आम्ही आमची बुद्धी कधीच वापरू नये का ? तुम्ही सर्वमान्य अशी sea-level ठेवानं काव्या मधे ! असे फार आत जाऊन मिळेल ते बाहेर काढून दाखवू नका , शब्दांच्या खेकड्यान शिवाय काही नसणार दुसरं ! आणि म्हणूनच हे गाणं म्हणताना याच वाक्क्याला मी बेसूर होतो :)

हो मला माहिती आहे , माझा हा आक्षेप वाचून काही  poetriatic लोकं शब्दांची छाती फुगवून म्हणतील "खरं अगाध प्रेम असेल तर स्त्री अशीच सुंदर वाटते" आणि  हे म्हणणाऱ्या mostly poetress असणार हे काही सांगायला नको :) पण या poetress ना आणि त्यांच्या supporters ना सांगायचय कि "जो बात तुझमे है , तेरी तस्वीर मे नही" असं साहजिक सुध्धा कवी लिहू शकतात !  आणि हेच कवी या sea-level ला  टेकलेल्या सूर्याच्या प्रकाशात कोणत्याही हसऱ्या स्त्री ला सुंदर करतात ! त्यांना "चौदहवी का चांद " च्या गोरेपणाची वाट नाही पहावी  लागत ! सांवली सुरत असलेल्या मोहनी मुरत ला पण ते रातकली च स्वरूप देतात !

whatsapp ने मला एकदा सांगितलं   , एक पुरुष देवाकडे जाऊन म्हणतो, "तू स्त्री ला इतकं सुंदर केलंस, बायकोला का नाही ?" तेंव्हा देव म्हणाला "मी सुंदर स्त्रीच पाठवली होती, तुम्हीच लग्नाचा शोध लाऊन तिला बायको केलंत" . Caring पुरुषामध्ये आणि नवऱ्या मधे कदाचित तोच फरक असेल. याच्या पुढे देव म्हणाला असेल , तुम्ही लग्नाचा शोध लाऊन स्त्री सौंदर्य वर्णनाची monumental responsibility  एकाच पुरुषावर टाकलीत ना , म्हणून नवर्यांना शब्दाच्या मदती करता मी हे कवी पटापट manufacture केले , पण design -defect राहून गेला आणि हे कवीं कधी कधी जरा जास्तच अवास्तव होतात !  . फरीश्त्या चं सोडा अहो मलाच ते उन्हामध्ये मध्ये गच्चीत उभं करतात आणि म्हणायला लावतात "खुदा भी आसमा से जब  जमी पर देखता होगा " ! या कवींचा intermittent problem मी माझ्या test -lab मधे reproduce करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा लक्षात आलं की हा येतो, जेंव्हा हे कवी स्वतःच "मी कशी दिसते याच्या कडे तुमचं कधी लक्षच नसतं " याच्या  उत्तराच्या tension मधे लिहितात  !

चरबरीत जड जड कपडे आणि दागिने घालण्या बरोबर तीच मुलगी साध्या घरच्या soft कपड्यां मधे तेव्हढीच attractive  दिसते , या मुद्द्यावर माझ्या मुलाचं आणि माझं एकमत होतं ! ( बोंबला , यालाच म्हणतात का चुकीचे संस्कार ?! ) पावडर lipstick लाऊन छान दिसणारी स्त्री , नवऱ्याच्या बरोबरीने hiking cycling किंवा आडवी bat धरून घामाघूम क्रिकेट खेळते तेंव्हा ती तेव्हढीच छान दिसते, हे यांना माहिती नसतं का ? ! स्त्रियांचं सौंदर्य सुरु होतं ओठांपासून (wait , dont stop reading ) ! या वाक्याला (माझा मुलगा नाही हं ) सगळे कवी "गुलाबी होठ" करत होकार देतात पण या कवींना त्या ओठामागून येणाऱ्या गुलाबी शब्दांशी कधी घेणं देणं का नसतं ? हे गुलाबी शब्दं म्हणजे कविता किंवा गाणंच असायला पाहिजे असं काही  नाही,  साधा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही गुलाबी असू शकतो ना ?, in-fact हीच  pink shade बर्याच पुरुषांना आवडते आणि आपण विचारत राहतो "ह्याने हिला कशी काय पसंत केली " ? 
Oh my God , मी हे लिहिता लिहिता माझ्या लक्षात नाही आलं मी  "खुदा भी आसमा से जब जमी पर….  " गाणं गुणगुणतोय. "कोणीतरी"  मुद्दाम मला येउन विचारलं , हे कडवं माहिती आहेना या गाण्याचं  ? "फरिश्ते भी यहां रातोंको आकर घुमते होंगे,जहां रखती हो तुम पांव , जगह वो चुमते होंगे " !!!! नाही नाही देवा please ! , recall these poet-models  from the market ! they are doing more damage than the good ! :) 

सुdhir
Posted on: 2/28/2017 7:32:00 PM

an odd color leaf ..

 

While looking at these colorful yellow-orange-red fall leaves circling to the ground, I wonder why trees are exactly opposite of human beings.. first of all, trees give away something every day which they need everyday for living.. think of oxygen ! that is so "un-human" :) 

And now the winter is close, trees are ready with colorful leafy summer clothes !.. Some have already started shedding those..  are they heading to the beach ? Surely you too need a break after working hard over summer on your job of creating shades for tired humans .. but don't you feel cold for the beach ? 

Are you aware of those green guys among you ? Still green in color and green at heart, staring secretly at these colorful beauties around ? :)

Trees bend as the wind blows and humans always oppose and prove their point.. and that's why trees are “always there” for us, not like human beings who "change their mind" as they need.. trees shed their old rusty thoughts and become fresh new every year ! Not like human beings, keep on whining on old bad memories and die with them ! 

No wonder I am having these odd color thoughts while driving my odd color blue electric "LEAF", which ironically called as most "GREEN"..

 
1