DesiEvite Blog

Recently Posts

Categories

तेरी खातीर फरिश्ते

Tuesday, February 28, 2017 | 7:33:00 PM

तेरी खातीर फरिश्ते …

सर पे इल्जाम लेंगे , हुस्न कि बात चली तो,  सब तेरा नाम लेंगे , चांद आहे भरेगा  … हे गाणं माझ्या एकदा डोक्यात गुणगुण करणं  सुरु झालं कि थांबतं फक्तं कोणीतरी हे म्हणाल्या वर "क्या सुधीर, गाना बदलो न अभी ! " या गाण्याची tune मला फार आवडते पण माझी record अडकते ती या ओळींवर "तेरी खातीर फरिश्ते सर पे इल्जाम लेंगे" ! कारण मला लहानपणा पासून कोणत्याही कवीने स्त्री वर्णना मध्ये "पातळी" सोडली कि त्या फारीश्त्यांकडेच जाऊन complaint करावीशी वाटते !

पण मला काय माहिती हेच फरिश्ते आता जगाचं कल्याण सोडून, college कट्ट्या वर बसून, table-fan सारख्या माना फिरवत, प्रत्येक मुली कडे बघण्यात दंग असतात आणि तिचा रुमाल पडला कि तो इल्जाम आपल्या सर पर  घेऊन तिला तो प्रेमाने आणून देतात ? आणि परत फारीश्त्यांचा कळपामध्ये येउन म्हणतात " जवळून तर लय भारी हुस्न आहे एड्या !" come on poets, you  should have some लगाम on your "poetrism" when it comes to praising woman's beauty ! :) का कुणास ठाऊक , मला असं वाटतं , सर पे इल्जाम लेंगे हे वाक्य फक्तं mother teresa ना म्हणणं योग्यं वाटतं ! :) :)  बाकी सगळे शब्द काढून टाका आणि विचार करा ! चांद आहे ठीक आहे, फुल दिल ठाम हे पण ठीक आहे पण, आता तिथेच थांबा !  फारीश्त्यांना त्यांच्या profile प्रमाणे job करू द्या !

"जीवन से भरी तेरी आंखे" हे गाणं मी नेहमी गातो . नेहमी गातो याचा अर्थ असा नाही कि सुरात गातो  !   त्यातल्या या ओळी "मजबूर करे जिने के लिये " काहीच हरकत नाही  , "सागर भी तरसते है तेरे रूप का रस पिने के लिये" पण चालवून घेईन पण "मधुबन कि सुगंध ही सासो मे ?? आम्ही जरा त्या सागरा मध्ये डुंबायला लागलो तर सोडली तुम्ही वास्तवता लगेच :) हि कोणत्या nose spray ची  जाहिरात आहे का ?  म्हणजे आम्ही आमची बुद्धी कधीच वापरू नये का ? तुम्ही सर्वमान्य अशी sea-level ठेवानं काव्या मधे ! असे फार आत जाऊन मिळेल ते बाहेर काढून दाखवू नका , शब्दांच्या खेकड्यान शिवाय काही नसणार दुसरं ! आणि म्हणूनच हे गाणं म्हणताना याच वाक्क्याला मी बेसूर होतो :)

हो मला माहिती आहे , माझा हा आक्षेप वाचून काही  poetriatic लोकं शब्दांची छाती फुगवून म्हणतील "खरं अगाध प्रेम असेल तर स्त्री अशीच सुंदर वाटते" आणि  हे म्हणणाऱ्या mostly poetress असणार हे काही सांगायला नको :) पण या poetress ना आणि त्यांच्या supporters ना सांगायचय कि "जो बात तुझमे है , तेरी तस्वीर मे नही" असं साहजिक सुध्धा कवी लिहू शकतात !  आणि हेच कवी या sea-level ला  टेकलेल्या सूर्याच्या प्रकाशात कोणत्याही हसऱ्या स्त्री ला सुंदर करतात ! त्यांना "चौदहवी का चांद " च्या गोरेपणाची वाट नाही पहावी  लागत ! सांवली सुरत असलेल्या मोहनी मुरत ला पण ते रातकली च स्वरूप देतात !

whatsapp ने मला एकदा सांगितलं   , एक पुरुष देवाकडे जाऊन म्हणतो, "तू स्त्री ला इतकं सुंदर केलंस, बायकोला का नाही ?" तेंव्हा देव म्हणाला "मी सुंदर स्त्रीच पाठवली होती, तुम्हीच लग्नाचा शोध लाऊन तिला बायको केलंत" . Caring पुरुषामध्ये आणि नवऱ्या मधे कदाचित तोच फरक असेल. याच्या पुढे देव म्हणाला असेल , तुम्ही लग्नाचा शोध लाऊन स्त्री सौंदर्य वर्णनाची monumental responsibility  एकाच पुरुषावर टाकलीत ना , म्हणून नवर्यांना शब्दाच्या मदती करता मी हे कवी पटापट manufacture केले , पण design -defect राहून गेला आणि हे कवीं कधी कधी जरा जास्तच अवास्तव होतात !  . फरीश्त्या चं सोडा अहो मलाच ते उन्हामध्ये मध्ये गच्चीत उभं करतात आणि म्हणायला लावतात "खुदा भी आसमा से जब  जमी पर देखता होगा " ! या कवींचा intermittent problem मी माझ्या test -lab मधे reproduce करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा लक्षात आलं की हा येतो, जेंव्हा हे कवी स्वतःच "मी कशी दिसते याच्या कडे तुमचं कधी लक्षच नसतं " याच्या  उत्तराच्या tension मधे लिहितात  !

चरबरीत जड जड कपडे आणि दागिने घालण्या बरोबर तीच मुलगी साध्या घरच्या soft कपड्यां मधे तेव्हढीच attractive  दिसते , या मुद्द्यावर माझ्या मुलाचं आणि माझं एकमत होतं ! ( बोंबला , यालाच म्हणतात का चुकीचे संस्कार ?! ) पावडर lipstick लाऊन छान दिसणारी स्त्री , नवऱ्याच्या बरोबरीने hiking cycling किंवा आडवी bat धरून घामाघूम क्रिकेट खेळते तेंव्हा ती तेव्हढीच छान दिसते, हे यांना माहिती नसतं का ? ! स्त्रियांचं सौंदर्य सुरु होतं ओठांपासून (wait , dont stop reading ) ! या वाक्याला (माझा मुलगा नाही हं ) सगळे कवी "गुलाबी होठ" करत होकार देतात पण या कवींना त्या ओठामागून येणाऱ्या गुलाबी शब्दांशी कधी घेणं देणं का नसतं ? हे गुलाबी शब्दं म्हणजे कविता किंवा गाणंच असायला पाहिजे असं काही  नाही,  साधा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही गुलाबी असू शकतो ना ?, in-fact हीच  pink shade बर्याच पुरुषांना आवडते आणि आपण विचारत राहतो "ह्याने हिला कशी काय पसंत केली " ? 
Oh my God , मी हे लिहिता लिहिता माझ्या लक्षात नाही आलं मी  "खुदा भी आसमा से जब जमी पर….  " गाणं गुणगुणतोय. "कोणीतरी"  मुद्दाम मला येउन विचारलं , हे कडवं माहिती आहेना या गाण्याचं  ? "फरिश्ते भी यहां रातोंको आकर घुमते होंगे,जहां रखती हो तुम पांव , जगह वो चुमते होंगे " !!!! नाही नाही देवा please ! , recall these poet-models  from the market ! they are doing more damage than the good ! :) 

सुdhir

Posted By Sudhir Dharmadhikari

User Comments

Leave a comment/Review?

  • Your IP is being logged.
  • Your e-mail address is used only for verification purposes only and will not be sold, or shown publicly.
  • HTML tags allowed.