Sudhir Dharmadhikari

मानलेली Girlfriend

Tuesday, March 07, 2017 | 10:53:00 PM

मानलेली Girlfriend . .


मानलेल्या नात्यांमध्ये एक चांगलं असतं. एका side ने मानलं कि दुसऱ्याला नाही म्हणताच येत नाही. “नाही” म्हणलं तर सभ्यपणा समजत नाहीत. तशी माधुरी माझी मानलेली Girlfriend. कित्येक वर्षं झाली या नात्याला नावच सुचत नव्हतं. परवा अचानक कोणाशीतरी  बोलताना ते सुचलं. आता तरी तिला “नाही” म्हणताच येणार नाही :)


Oh by the way, ही दीक्षितांची माधुरी हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर i doubt you are qualified to read this article ! आणि आता हे दीक्षित कोण असं म्हणून आसपासचे दुसरे कोणीतरी आठवायचा प्रयत्न करत असाल तर मात्र तुम्ही आत्ताच जन्माला आला आहात असं मी समजतो. हो आणि अजून एक, (माधुरी असून सुद्धा) दुसऱ्या स्त्री चं कौतुक सहन न होणाऱ्या, कमकुवत हृदयाच्या स्त्रियांनी पण हा article वाचण्याचं धाडस करू नये.

college मधे असताना आमचा एक शाळेतला लहान आणि बावळट मित्र होता. पण तो आमच्या पेक्षा दूरदर्शी निघाला. तो अचानक एके दिवशी येउन म्हणाला “श्रीदेवी संपली”. मी म्हणलं ती काय डाळ तांदुळाची खिचडी आहे का संपायला ? पण नुकताच तेजाब बघून आला होता. नंतर आम्ही तेजाब वैगेरे तिचे सिनेमे बघत गेलो आणि वाटलं खरच श्रीदेवी खिचडीच होती,सगळं थोडं थोडं घातलेली. काहीच नाही घरात म्हणून पटकन पोट भरेल अशी. माधुरी ही wine पासून सुरुवात आणि Tiramisu च्या सुंदर dessert चा शेवट, अशी full course dinner होती. मधेच कधी chicken हंडी सारखी hot वाटायची तर कधी दाल rice सारखी simple. कधी “बहुत प्यार करते है” सारखं simple ड्रेस आणि simple expressions देत मोहरून टाकायची तर मधेच कधी “चोली के पीछे क्या है” असं द्विअर्थी म्हणत अस्वस्थ करायची. कधी “खेल” सारखी भूमिका करून हसवत ठेवायची.

 

सिनेमांमध्ये कधीतरी super star वाटायची तरी कधी college मधली नेहेमीचीच, काही कारण नसताना खिदी खिदी हसणारी. ती सुंदर dance करते आणि acting सुद्धा हे सांगण्यात वेळ घालवत नाही. तिच्याबद्दल ही “कोणीतरी जवळची” असं एक feeling यायचं. म्हणजे ती star असली तरी, एकदम रस्त्यात भेटेल सुद्धा, भेटली तर “हो नं, अजिबात अभ्यास झालेला नाही माझा” असं काहीतरी म्हणेल सुद्धा ! माधुरी चक्क मुलींना पण तेव्हढीच आवडायची ! (मला आवडत असून सुद्धा ) माझ्या बायकोला पण आवडते !! मी इथं खर म्हणजे लिहिणं थांबवू शकतो. पण लिहितोच . .

 

आपल्याला लहानपणी अशक्य गोष्टीवर निबंध लिहायला सांगायचे. “मी पंतप्रधान झालो तर” वैगेरे ! ही सवय college कट्ट्यांवर पण चालू राहते. कोणत्यातरी निरोद्योगी टाळक्याने एकदा विषय काढला, “सांगा, एक रात्र माधुरी दिली तर?” एकतर राहिलेल्या group ला “दिली” या शब्दाचा राग आला. तू कोण देणारा, काय तुझीच “मानलेली” आहे का ? हा पहिल्यांदा वाद. कोणालातरी या बाबतीत “देणं” हा शब्दं degrading वाटला. दुसऱ्याचं  निबंध वाचताना नेहेमीच हसू येतं. त्यामुळे मित्रांचे “रात्रभर मस्तं गप्पा मारीन” पासून “सगळं करीन” पर्यंत अश्या reactions होत्या. तिथे पण फुल course dinner ची variety!

 

“नजरे मिली दिल धडका love you राजा” ह्या गाण्यातलं “फक्तं” पांढऱ्या top वरच्या  गाण्यामधे तिचं नाचणं मोहक होतच पण आम्हाला पहिल्यांदा तो top म्हणजे त्याचा झब्बा वाटला ! अश्या ओल्या रात्री ह्याचा झब्बा तिच्या अंगावर कसा याच्यावर आम्ही पडका चेहरा करून discussion पण केलं.  हेच सगळे आम्ही मग, तिचं लग्न ठरलं तेंव्हा निषेधाचे काळे झब्बे  विकत घ्यायला गेलो. हेच काय, तिच्या लग्नाच्या अक्षतांमध्ये काळे तांदूळ मिसळणारे पण आम्हीच ! तिच्या घरच्यांच्या तिच्या नवऱ्या बद्दलच्या अपेक्षा ऐकून मात्र आम्ही पेटलो ! कुठेतरी वाचलं. “कोण माधुरी दीक्षित ?” असं विचारण्या इतपत तो मुलगा indian सिनेमा आणि तिच्याशी अनभिज्ञ असला पाहिजे ! एवढीच फक्तं अपेक्षा होती म्हणतात ! काय हे ! आम्हाला विचारता आला नसता का हा प्रश्न ?? आम्हाला ती माहिती नाही असं ओरडत मोर्चाही नेला असता कदाचित ! :)

 

माधुरी बरोबर कोणी अगदी नवखा आणि नुकताच acting school मधून बाहेर पडलेला हीरो असला की खूप राग यायचा. आम्ही college मधून कष्टानी degree मिळवणार, कुठेतरी trainee म्हणून लागणार , आणि office मधली  अडगळीची कामं आमच्या माथी, आणि या बच्च्यांना माधुरी ! संजय कपूर, सैफ अली, अक्षय कुमार हे असलेच सगळे. पास व्हायच्या आधीच मोठी नोकरी लागलेले ! अनिल कपूर बरोबर ती जरा जास्तच धक धक बिनधास्त असते म्हणून आमचा त्याच्यावर special राग. जाऊ दे.

मराठीमधे काही शब्दांमधेच त्याचा अर्थ लपलेला असतो. बघा नं, “सुंदर” हा शब्दच दिसायला किती सुंदर आहे. अर्थ सांगायची गरजच नाही. त्याची वळणाकृती मूर्ती बघा. तो “स” च्या उकाराचा साडी किंवा घागऱ्या सारखा घोळ बघा. ती कपाळावरची छोटीशी टिकली बघा. पण तरीही “सुंदर” हे बरचसं बाह्य सौंदर्या पर्यंत सीमित. पण “मोहक” शब्द ? आणि of course तसाच “मधुर” शब्दं. मधुर शब्दाचं माधुर्य वेगळंच. त्याला “सुंदर” च्या मर्यादा नाहीत ! सौदर्य वयस्कर होऊ शकतं, माधुर्य नाही ! तशीच ही माधुरी.

 

मी आत्ताच गम्मत म्हणून “define madhuri” असं google केलं आणि आलेली definition वाचून हसू आलं ! Meaning is “The most attractive girl in school. Dark, beautiful, funny, and smart. The best friend you will ever have and the most entertaining person you will ever meet”  येव्हढं  लिहिण्या पेक्षा ही link पुरेशी होती का ? http://www.urbandictionary.com/define.php?term=Madhuri


तर कधीतरी खरी नाती कदाचित तुटू शकतात, पण मानलेली नाही :)  So no breakup here ! :)

Posted By Sudhir Dharmadhikari

User Comments

Leave a comment/Review?

  • Your IP is being logged.
  • Your e-mail address is used only for verification purposes only and will not be sold, or shown publicly.
  • HTML tags allowed.